गोगलगाय व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानावर आधारीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) :  डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषीकार्यक्रमांतर्गत कृषीकन्यांनी आज कांबळेश्वर गावात एक प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले आहे, ज्यात त्यांनी एकात्मिक गोगलगाय व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले. या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनीनी शेतकऱ्यांना गोगलगाय समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले.

प्रात्यक्षिकाची वैशिष्ट्ये : सर्वसमावेशक व्यवस्थापन 

विद्यार्थिनींनी गोगलगायीच्या जीवनचक्राचा अभ्यास केला आणि एकात्मिक दृष्टिकोन वापरून नियंत्रणाचे उपाय प्रस्तावित केले. या दृष्टिकोनात नैसर्गिक शत्रूंचा वापर, जैविक नियंत्रण पद्धती, आणि विविध सापळ्यांचा वापर ,अडथळे व घरगुती उपाय यांचा समावेश होता. अलीकडील काळात गोगलगायी फार प्रादुर्भाव आढळतो आहे .ज्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे . त्यामुळे
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता नक्की सुधारली जाईल .आणि कृषी प्रक्रियेत सस्टेनेबल पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड व प्राध्यापक एस. व्ही. बुरुंगळे आणि प्रा. दळवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक साक्षी जाधव ,अपेक्षा रणनवरे, साक्षी कोरडे ,साक्षी सातपुते, सई पाटील, वर्षा जाधव ,ऋतुजा पारासुर या विद्यार्थिनींनी घेतले आहे .
शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानाची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा घडवण्यासाठी RAWE विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या प्रात्यक्षिकाने कृषी तंत्रज्ञानाच्या उपयोगातील नवीन दिशा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करण्यास मदत केली आहे.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा