डाळिंब लागवडीवर कृषीकन्यांचे प्रात्यक्षिक…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा ) : डॉ. शरदचंद्र पवार कृषी  महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत कृषीकन्यांनी आज कांबळेश्वर गावात सिस्टीमॅटिक डाळिंब लागवडीवर एक अत्यंत माहितीपूर्ण प्रात्यक्षिक घेतले. विद्यार्थिनींनी डाळिंब पद्धतशीर लागवडीच्या प्रक्रिया, जैसे की रोपणाच्या पद्धती, अंतर, आणि लागवडीचा प्लॅन याबद्दल  माहिती दिली.

विद्यार्थिनींनी डाळिंब लागवडीसाठी मातीच्या तयारीची प्रक्रिया दाखवली, ज्यामध्ये त्यांनी मातीच्या विश्लेषण, खड्डे खोदणे, आणि रोपणाची योग्य पद्धत यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी तंत्रज्ञान वापरून प्रभावी लगवडीची प्रक्रिया स्पष्ट केली. विद्यार्थिनींनी डाळिंब लागवडीसाठी योग्य रोपण पद्धतींचे प्रात्यक्षिक केले. यामध्ये रोपणाचे अंतर, रोपणाची खोली, आणि रोपांच्या व्यवस्थापनाचे तत्त्वे यांचा समावेश होता.

यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड प्राध्यापक एस. व्ही. बुरुंगळे आणि प्रा. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक साक्षी जाधव ,अपेक्षा रणनवरे, साक्षी कोरडे ,साक्षी सातपुते,  सई पाटील, वर्षा जाधव ,ऋतुजा पारासुर या विद्यार्थिनींनी घेतले आहे .

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा