बारामती (सहकार टाइम्स वृत्तसेवा ) बारामतीत आयोजित “कृषिक २०२५” च्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होत, उपस्थितांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केलं.
महाराष्ट्रातील आपल्या कृषी संस्कृतीला मोठा इतिहास आहे. या प्रदर्शनात शेती पद्धती आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड असल्यास समृद्धीकडे कृषी क्षेत्राची वाटचाल, या विषयाला धरून उभारण्यात आलेल्या गोष्टींचं सादरीकरण कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनात लाखो शेतकरी बांधव भेट देतील आणि शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करतील, ही अभिमानाची बाब आहे असे मत व्यक्त केले













