पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा) भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी 10 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 जानेवारी 2025 रोजी वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहावे.
रिक्त पदांची माहिती:
प्राध्यापक: 3 जागा
सहाय्यक प्राध्यापक: 3 जागा
सहयोगी प्राध्यापक: 4 जागा
शैक्षणिक पात्रता: संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिली आहे.
नोकरी ठिकाण: पुणे
मुलाखतीचा पत्ता:
भारती विद्यापीठ, 8 वा मजला, भारती विद्यापीठ भवन, एलबीएस रोड, पुणे – 411 030
महत्त्वाची माहिती:
मुलाखतीची तारीख: 29 जानेवारी 2025
उमेदवारांनी अर्जासह आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीला उपस्थित रहावे.
वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
अधिक माहिती आणि मूळ जाहिरात पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट: http://bvp.bharatividyapeeth.edu/
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
टीप:
सर्व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात वाचून तपशीलवार माहिती मिळवावी.http://bvp.bharatividyapeeth.edu/










