राज्याच्या सहकार खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलविणार – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात जाऊन पोहोचली आहे. या सहकारी पतसंस्थांचे अनेक प्रश्न महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने यश मिळविलेले आहे. काही अनुत्तरीत राहिलेले महत्त्वपूर्ण प्रश्न लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी आणि राज्याच्या सहकार खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलविणार असून महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करून सोडविणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी दिली.
       महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे शिर्डी येथे आले असता महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, तालुका पतसंस्था फेडरेशन पदाधिकारी आदींनी भेट घेऊन राज्यातील सहकारी पतसंस्थांची बाजू जोरकसपणे मांडत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांसह इतरही अनेक प्रश्नांना वाचा फोडली.
    राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी प्रामुख्याने थकबाकी कायदा गतिमान करणे, वेअर हाऊस व कोल्ड स्टोरेज बांधण्यास पतसंस्थांना परवानगी मिळणे आणि अंशदान न देता पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण द्यावे. अशा प्रकारचे महत्वपूर्ण प्रश्न मांडत सदर प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
     या वेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, संचालक वासुदेव काळे, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष वसंत लोढा, अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघाचे संचालक शिवाजी कपाळे, राहाता तालुका पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र वाबळे व उपाध्यक्ष साहेबराव निदाने, डॉ. के.वाय.गाडेकर, पारनेरचे वसंत कवाद, श्री.सोमनाथ लोखंडे आदींसह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Sahakar Times
Author: Sahakar Times

1 thought on “राज्याच्या सहकार खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलविणार – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री”

Leave a Comment

पुढे वाचा