पुस्तक अनावरण समारंभ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

माननीय श्री शैलेश कोतमिरे , सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी लिहिलेल्या असाध्य ते साध्य करिता सायास कथा एका बँकेची या पुस्तकाचा अनावरण समारंभ नुकताच माननीय माजी सहकार आयुक्त अनिलजी कवडे यांच्या हस्ते पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. यावेळी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर रासकर बँकिंग तज्ञ श्री गणेश निमकर , पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री दिगंबर दुर्गाडे तसेच विविध पतसंस्था व बँकांचे अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी या पुस्तकाचे लेखक शैलेश कोतमिरे यांनी कथा एका बँकेची या पुस्तकाची लेखनाबाबत अनुभव कथन केले. माननीय अनिल कवडे माजी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी या पुस्तकाबद्दल गौरवोद्गार काढले. ते पुढे म्हणाले की सदरचे पुस्तकाचे वाचन प्रत्येक बँक कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्याने करावे म्हणजे आपली बँक अडचणीतून बाहेर कशी पडेल व कशी बाहेर काढता येईल तसेच अडचणीत जाणार नाही हे जाण्यापूर्वीच अगोदरच समजेल.

 

 

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा