निंबुत 🙁 सहकार टाइम्स वृत्तसेवा ) निंबूत ता. बारामती फरांदेनगर येथे एक घर फोडले तर एका घराचे घराचा कडी कोंयडा तोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रोख रकमेसह दागिने असा ५५ हजाराचा ऐवज चोरीला गेला .आज ( दि.६ ) रोजी दुपारी साडे अकरा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला . यामध्ये कांतीलाल फरांदे यांच्या घरातील रोख रक्कम व दागिने गेले असून युवराज फरांदे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलीसांनी भेट दिली आहे.
तसेच बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधून मागील काही दिवसात चोरट्याने उच्छाद मांडला असून पोलीस चोरांना पकडण्यात व चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरले आहेत . सोमेश्वर नगर, वडगाव निंबाळकर, मुडाळे , निंबूत फरांदेनगर, तर आज कोह्राळे खुर्द या ठिकाणी आपला हात चोरट्याने साफ केला आहे. काल निंबुत फरांदेनगर येथे दिवसाढवळ्या चोरी झाल्याचे प्रकार घडलेला आहे तर आज दुपारी ठीक ४ वाजता कोह्राळे खुर्द नजीक चव्हाण वस्ती येते, बाळासो कोळेकर यांच्या घरी चोरी करण्यात आली आहे .
तसेच नागरिकांमध्ये ड्रोनची धास्ती घेऊन रात्रभर गस्त घालावे लागत आहे रात्रीची चोरी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पासून घडत असून कालपासून चोरट्याने दिवसाढवळ्यात घरे फोडण्यास सुरुवात केली आहे तसेच मागील काही दिवसांपासून आकाशात ड्रोन उडताना दिसत आहेत त्यामुळे नागरिकांना रात्रभर जागे राहून कष्ट घालावी लागत आहेत हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस स्टेशन तरीही चोरांच्या मनात पोलिसांविषयी कसलेच भीती राहिली नाही दिवसाढवळ्या चोरी झालेली पाहून नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे झालेल्या चोरीचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.












