पुणे ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) –( दि.१४) पुणे शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू नये, रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून सर्व विभागांनी समन्वय ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांना पावसात कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये म्हणून दक्षता बाळगावी, असे निर्देश पुणे शहरातील वाहतूक कोंडी संदर्भात झालेल बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
शुक्रवारी विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे प्र.पोलीस आयुक्त सुनील रामानंद, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित होते.











