सुमनसुत फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) सुमनसुत फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थी,पालक यांच्याकरीता राज्यस्तरीय नवोदितांसाठी काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे, विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. त्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी म्हणून ही सुमनसुत फाउंडेशनच्या वतीनेही राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित केल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष कवी सुमनसुत यांनी सांगितले. पालकांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या स्पर्धेची माहिती पोहोचवावी. ही स्पर्धा खुल्या गटासाठी देखील आहे ज्यात सर्व वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात या करीता आपल्या स्वरचित कविता पाठवीण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा १० ते १५ वर्षेपर्यंत प्रथम गट, १६ ते २४ वर्षे हा दुसरा गट आणि २५ पासून पुढे खुला गट अशा तीन गटामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच ही स्पर्धा सोशल मीडियाच्या तीन माध्यमांमध्ये होणार असून Facebook, Instagram आणि You Tube च्या संबंधित Channel आणि Page वर संपन्न होईल. याकरिता स्पर्धकांनी स्वलिखित कवितेचे वाचन करून Mobile आडवा आणि उभा पकडून दोन Video बनवून पाठवावेत.
कवितेला विषयाचे कोणतेही बंधन नसुन काव्यलेखन स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे फाऊंडेशनचे वतीने कळविण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी आयोजकांकडून WhatsApp Group बनवला जाईल ज्यात स्पर्धकांनी सहभागी होणे बंधनकारक नाही ते पुर्णपणे ऐच्छिक आहे. Video पाठवताना शक्यतो Document फाइल्स ने पाठवावा जेन्हेकरून Video स्पष्ट स्वरुपात मिळू शकेल असे कळविण्यात आले आहे.
सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असुन पुरस्कार खालील प्रमाणे देण्यात येणार आहेत.
प्रथम गट: १० ते १५ वर्षे वयोगट
प्रथम – रु १५०१/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
द्वितीय – रु १००१/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
तृतीय – ७५१/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

द्वितीय गट : १६ ते २४ वर्षे वयोगट
प्रथम – रु २००१/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
द्वितीय – रु १५०१/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

तृतीय – १००१/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

खुला गट
प्रथम – रु २५०१/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
द्वितीय – रु २००१/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
तृतीय – १५०१/- प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख २२ जून असून या स्पर्धेचा २६ जून रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करू शकता :  8160135720.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा