डाँ.शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे कांबळेश्वर मध्ये गावकऱ्यांनी केले स्वागत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा ) : आज ( दि. १९) डाँ.शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे कांबळेश्वर गावातील गावकऱ्यांनी स्वागत केले. डाँ.शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालया मार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या या गावात राहून शेतकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.एस.पी.गायकवाड , उपप्राचार्य प्रा.एस.व्ही.बुरुंगळे यांचे मार्गदर्शनाखाली शेतीविषयक अभ्यास करणार आहेत.
यानिमित्ताने आज कांबळेश्वर गावातील ग्रामस्थांच्या वतीने कृषीकन्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी ग्रामस्थांच्या सहकार्याने मुलींनी कांबळेश्वर गावच्या नकाशाची प्रतीकृती रांगोळीत सादर केली. कृषी कन्यांनी गावात येण्याचा उद्देश थोडक्यात सांगीतला , ग्रामीण जागरूकता कार्य अनुभव (RAWE) विद्यार्थ्यांना प्रामुख्याने ग्रामीण परिस्थिती समजून घेण्यासाठी, शेतकऱ्यांनी स्वीकारलेल्या कृषी तंत्रज्ञानाची स्थिती, शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी कृषी कुटुंबांसोबत काम करण्याची कौशल्ये आणि कृषी विकसित करण्यास मदत करने व त्याची माहिती घेणे , अभ्यास करणे असे सांगितले. यात साक्षी जाधव , अपेक्षा रणनवरे , साक्षी कोरडे , साक्षी सातपुते , सई पाटील , वर्षा जाधव ऋतुजा पारासुर या कृषीकन्या सहभागी झाल्या आहेत.


या वेळी संस्थेचे प्रतिक म्हणून कृषीकन्यांनी उपस्थित ग्रामस्थांना रोपे देऊन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला.
सदर कार्यक्रम प्रसंगी कांबळेश्वर गावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ , शेतकरी उपस्थित होते.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा