जनार्धनभाऊ फरांदे ग्रंथालय व अभ्यासिका सातवा वर्धापनदिन संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

निरा ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) : निरा परीसराच्या सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक परंपरे मध्ये मानाचा केंद्रबिंदु असणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निरा संचलित “जनार्धनभाऊ फरांदे ग्रंथालय व अभ्यासिका” चे दि १८ जून २०१७ रोजी स्थापना झाली आहे.ग्रंथालय व अभ्यासिकेचा सातवा वर्धापन दिन (स्थापना दिन) कार्यक्रम आज ( दि.१८ जून) संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

जनार्धनभाऊ फरांदे ग्रंथालय व अभ्यासिकेला सात वर्षे पुर्ण होत असुन आठव्या वर्षीत प्रदार्पण करीत असताना आतापर्यंत अभ्यासिकेतून पाच विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे त्यात प्रशांत पवार – रेल्वेमध्ये इलेक्ट्रिशियन, मृत्युंजय सिंह – रेल्वेमध्ये टेक्निशियन,आकाश सावंत – पाटबंधारे खाते, संदेश देडे – मुंबई पोलीस आणि योगेश निगडे – डॉक्टरेट करून आयटीआय मध्ये प्राध्यापक पदी निवड झाली आहे.

सध्यास्थितीत अभ्यासिकेत २२ मुली व १५ मुले असे एकूण ३७ एवढे विध्यार्थी असून,अभ्यासिकेत एमपीएससी,यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची एकूण ५३७ पुस्तके उपलब्ध आहेत तसेच वाचकांसाठी विविध विषयावरची १२२३ पुस्तके उपलब्ध आहेत.समता पतसंस्थेचे माध्यमातून चालवलेले हे ग्रंथालय व अभ्यासिका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरत असल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.अत्यंत अल्प दरात अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे व विद्यार्थ्यांची पुणे,सातारा व बारामती या ठिकाणी जाण्यापासून ससेहोलपट थांबली असून त्याकरिता जाण्याचा – राहण्याचा खर्च वाचला असल्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत आभार व्यक्त केले तर मुलींसाठी जवळ असल्याने या अभ्यासिकेस अनन्यसाधारण महत्व असल्याचे मत विद्यार्थिनींनी यावेळी सांगितले.
तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिलीपदादा फरांदे यांनी विद्यार्थ्यांना जी पुस्तके आवश्यक आहेत त्याची मागणी करावी त्यांना ती तात्काळ उपलब्ध करून दिले जातील असे सांगितले.

याकार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.दिलीपदादा फरांदे, मुख्यव्यवस्थापक तथा सचिव श्री.युवराज फरांदे, व्यवस्थापक श्री.राहुल ढोले, ग्रांथपाल श्री.दत्तात्रेय जमदाडे व ग्रंथालय,अभ्यासिकेचे विध्यार्थी,विद्यार्थ्यांनी,वाचक,संस्थेचे अल्पबचत प्रतिनिधी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते

Ganesh Chavan
Author: Ganesh Chavan

3 thoughts on “जनार्धनभाऊ फरांदे ग्रंथालय व अभ्यासिका सातवा वर्धापनदिन संपन्न”

  1. जनार्धनभाऊ फरांदे ग्रंथालय व अभ्यासिका सातवा वर्धापनदिन खूप खूप शुभेच्छा ????????????????

    Reply

Leave a Comment

पुढे वाचा