संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान : राज्यभरातून भाविक आळंदीत जमा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आळंदी ( सहकार टाईम्स वृत्तसेवा ) :  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान शनिवारी ( दि.२९)  होत आहे व दुसऱ्या दिवशी ( दि. ३०) पालखी सोहळा आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होईल, अनेक वर्षाच्या परंपरेने चालत आलेली वारी माऊली चरणी रुजू करण्यासाठी राज्यभरातून भाविक आळंदीत जमा झाले असून आळंदी हरीमय झाली आहे.

प्रशासनाची वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी लगबग सुरू असून धर्मशाळामधून हरिनामाचे गजर चालू आहे एकूणच आळंदीत भक्तीमय असे वातावरण झाले आहे.

चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू ।

भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू  ।

ही भावना वरचे ठेवून हजारो संख्येने भाविक वारकरी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत दाखल होत आहेत. यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने अनेक वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे ज्येष्ठ वैद्य अष्टमीला शनिवारी ( दि.२९)  सायंकाळी ४ वाजता माऊलींच्या पालखीचे पंढरपूर पंढरपूरकडे प्रस्थान होईल पहिला मुक्काम आळंदी येथे दर्शन मंडप इमारत येथे असेल. ३० जूनला पालखी सोहळा सकाळी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होईल ३० जून व १ जुलै पालखी सोहळ्याचा मुक्काम पुण्यात असेल अशी माहिती ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवस्थान कडून देण्यात आले आहे.

पुणे येथे दोन दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा २ जुलैला सकाळी सासवड मुक्कामाकडे मार्गस्थ होईल २ आणि ३ जुलै असे दोन दिवस पालखी सोहळा सासवड मुक्कामी असेल. पालखी सोहळ्याचा ४ जुलै चा मुक्काम जेजुरी , ५ जुलै वाल्हे , ६ आणि ७ लोणंद , ८  जुलै तरडगाव,  ९ जुलै फलटण,  १० जुलै बरड, ११ जुलै नातेपुते , १२ जुलै माळशिरस,  १३ जुलै वेळापूर,  १४ जुलै भंडीशेगाव, १५ जुलै वाखरी तर आषाढ शुद्ध दशमीला १६ जुलै पालखी सोहळा पंढरपूर मुक्कामी पोहोचेल,  १७ जुलैला आषाढी एकादशी आहे,  २० जुलैपर्यंत पालखी सोहळा पंढरपुरात राहील त्यानंतर २१ जुलैला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल ३० जुलैला पालखी परतीचा प्रवास करून आळंदी मुक्कामी पोहचेल.


 

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा