नीरा ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) वारकऱ्यांच्या सेवेत समता पतसंस्था; ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात बुंदी पाकिटांचे वाटप
“पांडुरंगा कसा करू तुझी सेवा, भावे माझ्या ओथंबला देवा…”
अशा भावनिक अभंगाच्या स्वरांत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात भक्ती, सेवा आणि समर्पणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पवित्र निमित्ताने समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा यांच्या वतीने वारकऱ्यांना बुंदीच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या या भक्तिमय परंपरेत सहभागी होत संस्थेने सेवाभावाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली.
हा उपक्रम संस्था अनेक वर्षांपासून सातत्याने राबवत असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी संस्थेची निष्ठा आणि बांधिलकी यावेळी पुन्हा एकदा दिसून आली. विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना दिलेले हे अल्पोपहाराचे बुंदी पाकीट त्यांच्या प्रवासात ऊर्जा आणि आनंद देणारे ठरले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीपदादा फरांदे, उपाध्यक्ष उत्तम आगवणे, संचालक मंडळातील सदस्य, संस्थेचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी युवराज फरांदे, व्यवस्थापक राहुल ढोले, कर्मचारी वर्ग तसेच दैनिक बचत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचा हा उपक्रम केवळ सामाजिक कार्य नसून वारकरी संप्रदायाशी असलेले आत्मीय नाते अधिक दृढ करणारा ठरत आहे. भविष्यातही अशा सेवा उपक्रमांत संस्थेचा सहभाग कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.









