माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त समता पतसंस्थेच्या वतीने खाऊ वाटप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नीरा ( प्रतिनिधी ) : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निरा येथून लोणंदच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होत असताना, निरा परिसरातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा संस्थेने वारकऱ्यांना बुंदीची बनवलेली पाकीटे वाटप केली.

माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त संस्थेचे हे २५ वे खाऊ वाटप कार्यक्रम होते,असे संस्थेचे अध्यक्ष दिलीपदादा फरांदे यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीपदादा फरांदे आणि संचालक मंडळ उपस्थित होते. मुख्य व्यवस्थापक तथा सचिव युवराज फरांदे, व्यवस्थापक राहुल ढोले, संस्थेचे अल्पबचत प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी खाऊ वाटप कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावर्षी दोन हजार पाचशे बुंदीची पाकीटे आणि पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आले.

Ganesh Chavan
Author: Ganesh Chavan

Leave a Comment

पुढे वाचा