उसाची रोपे तयार करण्याचे कृषीकन्यांनी केले मोफत मार्गदर्शन…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत कृषीकन्यांनी आज कांबळेश्वर ( बारामती )  गावात उसाची रोपे तयार करण्याची पद्धत याबद्दल माहिती दिली .

यामध्ये त्यांनी बेण्यासाठी उसाची निवड कशी करावी, बेण्यांवरती रासायनिक प्रक्रिया कशी करावी , रोपे तयार करण्यासाठी ट्रे कसे भरावेत आणि मीडिया (कोकोपीट) कोणता वापरावा .तसेच ट्रे भरण्यापासून रोपे लागवडीसाठी तयार होईपर्यंत कोणती काळजी घ्यावी , कोणती खते , जैविके वापरावीत याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड व प्राध्यापक एस. व्ही. बुरुंगळे आणि प्रा. करपे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक साक्षी जाधव ,अपेक्षा रणनवरे, साक्षी कोरडे ,साक्षी सातपुते, सई पाटील, वर्षा जाधव ,ऋतुजा पारासुर या विद्यार्थिनींनी घेतले . यावेळी अनेक शेतकरी पुरुष महिला यांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा