मराठी भाषेला अभिजात दर्जा…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) –मराठा भाषेला अभिजात दर्जा देण्यात आल्याचा मोठा निर्णय़ केंद्र सरकारने घेतला आहे. मराठीबरोबरच केंद्र सरकारने पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. अभिजात भाषा भारताच्या गहन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाचे संरक्षक म्हणून काम करतात, प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मैलाच्या दगडाचे सार मूर्त रूप देतात असे सांगत हा निर्णय़ घेतला.

‘लाभले आम्हास भाग्य…’ मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा
बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या मागणीला मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात येत होती. मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस !
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.
हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा