फरांदेनगर येथे योग शिबिर सप्ताहचे आयोजन : युवराज फरांदे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती (सहकार टाइम्स वृत्तसेवा) दि १५ : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमानुसार कर्वे समाज सेवा संस्था पुणे यांच्या सहकार्याने योगतज्ञ योगशिक्षक डॉ.धनंजय इचेकर , योगशिक्षिका युगंधरा शिराढोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक १६ रोजी फरांदेनगर निंबुत ता. बारामती जि. पुणे येथे योग शिबिर सप्ताहचे आयोजन करण्यात आले असल्येची माहिती युवराज फरांदे यांनी दिली .

या योगशिबिरात योगासन पुर्व हालचाली ,सूर्यनमस्कार ,विविध प्रकारचे असणे, प्राणायाम, ॐ ध्यानधारणा ,बंध, नेती प्रक्रिया , या गोष्टी मोफत शिकवल्या जाणार असून योगासनाबद्दलची माहिती, योगासने कोणी करावीत, कोणी करू नये, योगासनाचे फायदे काय , प्राणामाचे फायदे काय या बाबी सांगितल्या जाणार आहेत. हे योग शिबिर सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत सात दिवस चालणार असून रविवार दि.१६ रोजी सुरुवात होऊन शनिवारी शिबिराचा समारोप होणार आहे . सदर शिबिराचा सर्व महिला, पुरुष ,युवक, व बारा वर्षे वरील विद्यार्थ्यी यांनी लाभ घेण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन योगसाधक युवराज फरांदे यांनी केले आहे.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा