नीरा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यासमोर चोरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

निरा ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) दि.१७ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राख येथील चंद्रकात पवार यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून पोल्ट्रीशेड तयार करण्यासाठी कर्ज प्रकरण केले होते. त्याची रक्कम नीरा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील खात्यात जमा झाले होते. ती रक्कम काढण्यासाठी पवार सोमवारी (दि.१७) दुपारी १२:४० च्या सुमारास आले होते. १ लाख रुपये रोख रक्कम बॅंक खात्यातून काढल्यावर ती रक्कम, व्यावसायाचा रबरी शिक्का, बॅंकेचे चेकबुक निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले होते. बॅकेतून बाहेर आल्यावर नीरा बारामती रस्त्यावर लावलेल्या बजाज प्लॅटीन मोटारसायकल क्र. एम. एच. १२ / एफ.एल. ४७७९ च्या हॅन्डेलला लावली व ते मोटरसायकल वरती जावु लागलो तेंव्हा पवार यांना एक अज्ञत इसमाने तुमचे पैसे रोडवर पडले आहेत, असे सांगीतले. त्यांना पैसे रोडवर पडलेले दिसले. म्हणून त्यांनी १ लाख रुपयांची हॅडेलला लावलेली पिशवी सह मोटरसायकल स्टॅण्डवर लावून, रस्त्यावर पडलेले पैसे गोळा केले. पवार यांनी रस्त्यावरील पडलेले पैसे गोळा करून पुन्हा आपल्या मोटारसायकलकडे आले असता मोटारसायकलच्या हँडलला लावलेली एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी दिसून आली नाही. त्यामुळे बॅंक परिसरात पिशवीचा शोध घेतला पण रक्कम असलेली पिशवी आढळून आली नाही. त्यामुळे पवार यांची खात्री झाली की आपली १ लाख रुपये रोख रक्कम, रबरी शिक्का व चेकबुक असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लक्ष विचलीत करुन चोरुन नेली आहे. या घटनेची पवार यांनी तात्काळ नीरा पोलीसांत तक्रार दाखल केली असुन, नीरा पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार रविराज चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा