योग म्हणजे निरोगी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

निंबूत फरांदेनगर येथे योग शिबिर संपन्न 

बारामती ( सहकार टाइम्स वृत्तसेवा )  निंबूत फरांदेनगर येथे आयोजित केलेल्या योग शिबिराचे उद्घाटन समारंभाच्या दिवशी भारतीय सेनेतील जवान अभिनंदन फरांदे यांनी आपले मत व्यक्त करताना योगाबद्दल माहिती सांगितली .योगला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान द्यावे योग म्हणजे निरोगी आयुष्याची एक गुरुकिल्ली आहे असे उद्गार काढले. कर्वे समाज सेवा संस्था व त्यांचे विद्यार्थी युवराज फरांदे यांनी या योग शिबिराच्या निमित्ताने आपल्याला एक निरोगी आयुष्य कसे जगता येईल याचा यशस्वी कानमंत्रच आपल्याला दिला आहे त्याचा उपयोग आपण आपल्या पुढील आयुष्यात योग्य प्रकारे करुन घ्यावा असे मी आव्हान यानिमित्ताने करतो व आपले पुढील आयुष्य निरोगी व सुदृढ राहावे याकरता प्रार्थना करतो व आपणासाठी शुभेच्छा व्यक्त करतो.ॐ सर्वे भवन्तु सुखिनः ।सर्वे सन्तु निरामयाः ।सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः


यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमानुसार कर्वे समाज सेवा संस्था पुणे यांच्या सहकार्याने योगतज्ञ योगशिक्षक डॉ.धनंजय इंचेकर , योगशिक्षिका युगंधरा शिराढोणकर , योगशिक्षक भालचंद्र रोडे आणि योगशिक्षका योगीता शिरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले वर्षभर योगशिक्षण सराव योगसाधक युवराज फरांदे यांनी करुन कर्वे समाज सेवा संस्था पुणे चे योग शिक्षक डाँ. धनंजय इंचेकर यांचे सुचनेनुसार व अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून निंबूत फरांदेनगर येथे योग शिबिराचे आयोजन  दि. १६ मार्च पासून करण्यात आले होते .
योग शिबिराचा सांगता समारंभ रविवार दिनांक २३ मार्च रोजी झाला. यावेळी अनेक सहभागी साधकांनी आपले मनोगत व्यक्त केले .


योगशिक्षण वर्ग दर रविवारी चालू ठेवावा म्हणजे योगासना बद्दल आम्हाला आणखी माहिती मिळेल. विशेषत या योगासन वर्गात जी जल नेती शिकवली त्यामुळे आमच्या मनातील भिंती गेली आणि आमचा सर्वांचा आत्मविश्वास वाढविल्याबद्दल मी आपली आभारी आहे:  पूणम फरांदे 
या योगशिबिरात योगासन पुर्व हालचाली ,सूर्यनमस्कार ,विविध प्रकारचे असणे यात बैठक स्थितीतील असणे दंड स्थितीतील असणे शयन स्थितीतील असणे विपरीक्षा असणे प्राणायाम, ॐ ध्यानधारणा ,बंध, नेती प्रक्रिया , या गोष्टी मोफत शिकवल्या असून योगासनाबद्दलची माहिती योगासने कोणी करावीत, कोणी करू नये, योगासनाचे फायदे काय , प्राणामाचे फायदे काय या बाबी सांगितल्या . योग साधक युवराज फरांदे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात अनेक महीला , पुरुष, तरुण, व लहान बालकांनी सहभागी होत योगासनाबद्दल माहिती जाणून घेतली.

या योगासन शिबिराचे आयोजन कर्वे समाजसेवा संस्था यांच्या वतीने युवराज फरांदे यांनी केले त्याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत असून योग शिबिर घेतल्याबद्दल सहभागीय शिबिरार्थीने त्यांचे आभार मानून पुढेही असेच योग शिबीर घ्यावीत याबद्दल विनंती करून योग शिबिराची सांगता करण्यात आली .

Sahakar Times
Author: Sahakar Times

1 thought on “योग म्हणजे निरोगी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली.”

Leave a Comment

पुढे वाचा