डॉ. संभाजी मलघे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना प्रदान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरग मध्ये हा कार्यक्रम आयॊजीत करण्यात आला होता, या पुरस्कार समारंभाच्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर तसेच महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सचिन ईटकर आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे संस्थेचे कार्यवाहक चंद्रकांत शेटे तसेच सर्व संस्था पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर वर्ग यांनी डॉ. मलघे यांचे अभिनंदन केले.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा