महात्मा फुले वाड्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा) दि. ११: समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात आपलं अनमोल योगदान देणारे थोर समाजसुधारक आणि विचारवंत महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त, आज पुण्याच्या गंज पेठ येथील त्यांचं निवासस्थान महात्मा फुले वाड्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट दिली.


यावेळी फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. तसेच फुलेंशी संबधित छायाचित्रे आणि वस्तूंचा संग्रह असलेल्या संग्रहालयाची पाहणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा