पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला आज सदिच्छा भेट दिली. मा डॉ पंकजजी भोयर यांच्याकडे सहकारासोबतच गृह, शालेय शिक्षण, गृहनिर्माण, खनिकर्म या खात्यांचा राज्यमंत्री प्रभार आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक जुगादे यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती मंत्री महोदयांना दिली. या वेळी विवेकानंद पतसंस्थेबद्दल सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी गौरवोद्गगार काढले .
विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य व प्रगती पाहून मी प्रभावित झालो आहे. खऱ्या अर्थाने सहकार तत्त्वावर चालणारी ही महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून आपल्या हातून जणू काही समाजसेवाच घडत आहे असे गौरवोद्गगार माननीय महोदयांनी याप्रसंगी बोलताना काढले.
विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री विवेक जुगादे व उपाध्यक्ष श्री महेश अंधारे यांनी मंत्री महोदयांचे शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री कल्याण दिवाण, श्रीकांत आगलावे, ईश्वर परचाकी, दीपक बारड यांसह सहकार भारतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














