GDC&A परीक्षा जाहीर: अर्ज प्रक्रियेला सुरुवात सहकार खात्याची अधिसूचना प्रसिद्ध

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे (सहकार टाईम्स वृत्तसेवा ): राज्यातील सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या GDC &A ( सहकारी गृहनिर्माण शासकीय सहकार व लेखा पदविका) आणि CHM, ( सहकारी गृहनिर्माण संस्था प्रमाणपत्र ) परिक्षांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सहकार खात्याने यासंबंधीची दि. ७ जानेवारी २६ रोजी अधिसूचना जारी करत फॉर्म भरण्याच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून अधिसूचनेची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, अर्ज प्रक्रिया निश्चित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करणे बंधनकारक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, शुल्क भरण्याची पद्धत, तसेच पात्रतेचे नियम याबाबतचे तपशीलही अधिसूचनेत देण्यात आले आहेत. फॉर्म भरण्यासाठीचा ऑनलाईन दुवा सहकार खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचना काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
GDC& A आणि CHM या दोन्ही परीक्षा राज्यातील सहकारी संस्थांमध्ये नियुक्ती, बढती आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात. अनेक जिल्हा सहकारी बँका, क्रेडिट सोसायटी, प्रक्रिया संस्थांमध्ये नोकरीसाठी या कोर्सना विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करतात.
या वर्षी परीक्षा पद्धती, मार्गदर्शक तत्वे सहकार खात्याने स्पष्ट केल्या आहेत. ऑनलाईन फॉर्म भरताना होणाऱ्या त्रुटी टाळण्यासाठी ‘ट्रायल फॉर्म’ पर्याय, तसेच शुल्क भरण्यानंतरची पुष्टी-प्रक्रिया यासंबंधीच्या सूचना अधिसूचनेत नमूद आहेत.
सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पाळणे अत्यावश्यक आहे. मुदत संपल्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी फॉर्म भरताना कागदपत्रांची शाश्वती तपासावी.”
दिनांक ०७/०१/२०२६ रोजी परीक्षा केंद्रांची यादी, दिवस-तारीख अधिसूचनेव्दारे प्रसिद्ध केली असल्याचेही खात्याने कळवले आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहकार खात्याने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार महत्त्वाच्या तारखा व परिक्षा केंद्र

परिक्षा केंद्र: :अहिल्यानगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगांव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व ठाणे

परिक्षा वेळापत्रक : दिनांक : २६, २७ व २८ मे, २०२६

अर्ज करण्याची तारीख : दि. ०९/०१/२०२६ पासून दि. २३/०२/२०२६ पर्यंत
आँनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या. https://gdca.maharashtra.gov.in

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा