यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या योग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२६ साठी विविध योग अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे सर्व अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त आहेत.

यामध्ये प्रामुख्याने एम.ए. (योग) आणि डिप्लोमा इन योगशिक्षक या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. एम.ए. (योग) (कोर्स कोड M-81) या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षे असून कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. अभ्यासक्रमाचे माध्यम प्रामुख्याने मराठी असून, परीक्षा विभागाच्या पूर्वपरवानगीने इंग्रजी व हिंदी माध्यमातूनही परीक्षा देता येईल.

तसेच डिप्लोमा इन योगशिक्षक (कोर्स कोड P-126) या अभ्यासक्रमाचा कालावधी १ वर्ष आहे. यासाठी १२ वी उत्तीर्ण / डिप्लोमा उत्तीर्ण व १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाचे माध्यम मराठी व इंग्रजी आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. प्रवेश घेताना अभ्यास केंद्र कोड ६२५१६ निवडणे आवश्यक आहे.

पुणे शहरात हे अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यास केंद्र – दि पूना गुजराती केळवनी मंडळाचे हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय, शनिवार वाड्यामागे, बुधवार पेठ, पुणे येथे उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी व माहितीपत्रकासाठी
वैद्य. धनंजय इंचेकर
मोबाईल: ९४२३४३८७८४ / ७०३८२३७०६१
किंवा महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला
https://hvdesaicollege.org
भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा