रासायनीक खतांमध्ये केली जाणारी भेसळ प्रतिबंधासाठी कृषीकन्यांचे मार्गदर्शन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी
कार्यक्रमांतर्गत कृषीकन्यांनी आज कांबळेश्वर गावात रासायनीक खतांमध्ये केली जाणारी भेसळ कशी ओळखावी याबद्दल शेतकरी वर्गास मार्गदर्शन केले. विद्यार्थीांनीनी अधोरेखित केले की फसवणूक केलेल्या खतांचा वापर केल्याने पिकांची गुणवत्ता कमी होते आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.भेसळयुक्त खतं पिकांच्या उत्पादनक्षमता कमी करतात, मातीची गुणवत्ता खराब करतात, आणि शेतीला हानी पोहचवतात.
RAWE विद्यार्थिनींनी खतातील भेसळचा अभ्यास केला आणि त्याच्या परिणामांची सखोल माहिती संकलित केली. हया प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळाली .
या अंतर्गत, युरिया,एम.वो.पी,एस.एस.पी.,डी.ए.पी.,कॉपर सल्फेट या रासायनिक खतांमध्ये होणारी भेसळ कशी ओळखावी याबद्दल कृषिकन्यांनी मार्गदर्शन केले व भेसळ ओळखण्याची प्रक्रिया सांगितली .
प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना प्रमाणित खतं वापरण्याचे महत्व समजावून सांगण्यात आले आहे, तसेच कशा प्रकारे त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारता येईल हे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड व प्राध्यापक एस. व्ही. बुरुंगळे आणि प्रा. गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक साक्षी जाधव ,अपेक्षा रणनवरे, साक्षी कोरडे ,साक्षी सातपुते, सई पाटील, वर्षा जाधव ,ऋतुजा पारासुर या विद्यार्थिनींनी घेतले आहे

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा