कमवा आणि शिका : कर्मवीर भाऊराव पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

          काही व्यक्ती अशा असतात, ज्या इतरांचं भलं व्हावं यासाठी झटतात. “कमवा आणि शिका” ही संकल्पना देणारे कर्मवीर भाऊराव पाटीलत्यांची दूरदृष्टी आजही समाजाला अत्यंत भरीव असं योगदान देते. कर्मवीर भाऊराव पाटील हेही अशाच थोर व्यक्तींपैकी एक. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लावलेला शिक्षणाचा ज्ञानदीप आजही तेवत आहेग्रामीण भागात समाज परिवर्तनाची गंगा न्यायची असेल तर त्यासाठी शिक्षणासारखा दुसरा गुरू नाही हे आजपासून १०० वर्षांपूर्वी जाणणारा आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारा एक अवलिया म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे पाहिलं जातं.
ज्ञानगंगेचा घरोघरी प्रसार व्हावा म्हणून झटणारा, ही ज्ञानगंगा घराघरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत कशी पोहोचेल, यासाठी प्रयत्न करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी आहे.२२ सप्टेंबर १८८७ रोजी भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. १९०२ ते १९०७ ही वर्ष कर्मवीर भाऊराव पाटील कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिकले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यावेळेस इंग्रजी सहावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. कोल्हापुरात शिक्षण घेत असतानाच त्यांच्या जीवनावर महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी यांच्या जीवनाचा खूप प्रभाव पडला.
शिक्षण हाच विकासाचा पाया आहे हे जाणून काही मित्रांच्या साथीनं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम ही शाळा सुरू केली आणि इथुनच त्यांच्या कर्मवीर होण्याची सुरूवात झाली.
श्रम, स्वावलंबन आणि समता या तीन तत्वांवर कर्मवीरांनी मग रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. बहुजन,दीन किंंवा आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना या रयत शिक्षण संस्थेत सामिल केलं जात असे.श्रम करतानाच त्याच्या मिळणाऱ्या मोबदल्याचा काही भाग विद्याभ्यासासाठी वापरला गेला पाहिजे हे त्यांना पक्कं जाणलं होतं. त्यामुळेच कमवा आणि शिका ही संकल्पना लागू करून भाऊरावांनी मागासलेल्या जाती आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना शिकवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शिक्षण घ्या, शहाणे व्हा, पालकांचे दारिद्र्य आड येऊ देऊ नका, घाम गाळून शिका, समाजाच्या उपयोगासाठी शिका असे असं भाऊराव नेहमी म्हणंत. शिक्षणामुळे माणूस बहुश्रुत होतो या मतावर भाऊराव ठाम होते.अशा या कर्मवीराला भारत सरकारने २६ जानेवारी १९५९ ला त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले.०९ मे १९५९ रोजी या वंदनीय व्यक्तीने आपला देह ठेवला. मात्र त्यांनी शिक्षणाचा लावलेला दिवा आजही अखंड तेवत आहे.
Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा