बारामती (सहकार टाईम्स वृत्तसेवा) ज्योतिरावांच्या कार्याचा सन्मान म्हणून जनतेने सभा घेऊन फुलेंना महात्मा ही पदवी बाल केली जनतेने सभा घेऊन ‘महात्मा’ ही पदवी बहाल केलेले ज्योतिराव फुले हे एकमेव कृतिशील समाज सुधारक व विचारवंत ठरतात.
अज्ञानाच्या अंधाकारात अडकलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी कार्य केलं . अस्पृश्यतेच्या विरोधात आंदोलन उभं केलं . स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली, विधवा पुनर्विवाह असेल किंवा आंतरजातीय विवाह असतील असे जाती अंताचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले . चार भिंतीमध्ये बंदिस्त असलेल्या महिलांना मुक्त श्वास घेण्याचा अधिकार दिला. छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शोधा बरोबर पहिली शिवजयंती साजरी करून महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला . शेतकऱ्यांची दयनीय अवस्था का झाली हे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून दाखवून दिले. १९८२ मध्ये हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावं ही मागणी केली, अशी मागणी करणारे ज्योतिराव फुले हे पहिले समाज सुधारक ठरतात. आपल्या साहित्यामध्ये बळीराजा , बुद्ध तसेच शूरवीर महार जातींचा इतिहास मांडला आहे . संपूर्ण जगाला मानवते कडे घेऊन जाईल असा सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ निर्माण केला .फुलेंची प्रेरणा घेऊन अनेक चळवळी, अनेक विचारवंत व समाजसुधारक उदयास आले. ज्योतिरावांच्या नेतृत्वात भारतातील पहिली कामगार संघटना उभी राहिली. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे दिनबंधू वृत्तपत्र उभे राहिले. सत्यशोधक समाज स्थापन करून सर्व जाती-धर्माच्या लोकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेतले . आश्रया या कृतीशील समाज सुधारकांच्या प्रती आदर म्हणून ११ मे रोजी मुंबईमधील भायखळा येथे असलेल्या रघुनाथ महाराज सभागृह मध्ये मुंबई येथे जनतेने ज्योतिराव फुलेंना वयाच्या ६१ व्या वर्षी महात्मा ही पदवी बहाल केली सदरील समारंभास अनेक मातब्बर मंडळी उपस्थित होती. पदवीदान कार्यक्रमानंतर महात्मा फुले यांनी भाषण केलं जनतेचे प्रेम पाहून फुलेंचे मन भरून आलं महात्मा फुले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि जोतिराव फुले महात्मा झाले.













