सहकार आयुक्तपदी दिपक तावरे यांची नियुक्ती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) राज्याच्या सहकार आयुक्तपदी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी दिपक तावरे यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने सोमवारी जाहीर केले. तत्कालीन सहकार आयुक्त अनिल कवडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकार आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहकार विभागातील जेष्ठ अधिकारी व सहकाराचे विशेष आयुक्त व अपर निबंधक शैलेश कोतमीरे यांच्याकडे देण्यात आला होता . आता दिपक तावरे यांच्या नियुक्तीने सहकार आयुक्तपदी पूर्ण वेळ अधिकारी मिळाल्याने सहकाराच्या कामकाजास गती येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
देशात सहकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी असून सहकार आयुक्त पदावर नियुक्ती बाबत प्रशासकीय पातळीवरही सातत्याने चर्चा होत होती. दिपक तावरे यांची राज्य वखार महामंडळाचे अध्यक्षपदावरून मुंबई येथे राज्य कामगार विमा योजना येथे आयुक्तपदी बदली झाली होती त्यानंतर पुण्याच्या यशदा उपमहासंचालक पदी बदली झाली होती यानंतर आता शासनाने त्यांची नियुक्ती सोमवारी ( दिनांक २७/०५/२०२४) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या रिक्त पदावर केली . हे पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून ही नियुक्ती केल्याचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव ( सेवा) नितीन गद्रे यांनी काढले आहेत.
दीपक तावरे हे मूळ सहकार विभागातील ज्येष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सहकार विभागात यापूर्वी विविध पदे भूषविले आहेत पुणे विभागीय सहनिबंधक, साखर सहसंचालक , सोलापूर महानगरपालिका आयुक्त या पदावर त्यांनी काम केले आहे भारतीय प्रशासन सेवेत नियुक्त झाल्यानंतर प्रथम त्यांची राज्याच्या पण संचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती . त्यांच्या कारकिर्दीत महामंडळाने समृद्धी महामार्गावर लॉजिस्टिक पार्कचा महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविला आहे. त्यांनी ( दि. २७) सायंकाळी सहकार आयुक्त पदाचा पदभार शैलेश कोतमिरे यांच्याकडून स्वीकारला.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा