प्रेरणादायी सुरज : चक्क पायाने सोडविला पेपर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रेरणादायी सुरज : चक्क पायाने सोडविला पेपर

पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) मनाचा ठाम निग्रह आणि अथक परिश्रमाने अडचणीवर मात करता येते, समाजात अशी दुर्मिळ उदाहरणे दिसतात जी परिस्थिती समोर न डगमगता लढण्यासाठी प्रेरित करतात. जन्मता दिव्यांग असताना दोन्ही हात नसल्यामुळे चक्क पायाने पेपर लिहून उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न बाळगणारा सुरज इच्छाशक्ती दृढ असेल तर संकटांना पुरून ध्येयापर्यंत पोहोचता येत असल्याचा संदेश प्रथम वर्ष बीएचे पेपर लिहून देत आहे.

सुरज शब्बीर मुजावर याने,  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्र अंतर्गत प्रथम वर्ष बीए या वर्गात श्रीराम शिक्षण महाविद्यालय पाणीव ता. माळशिरस जि. सोलापूर या अभ्यास केंद्रात प्रवेश घेतला आहे . सुरज हा दुष्काळी भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून तो जन्मता अपंग आहे.  त्याने बारावी नंतरचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.  सूरजने मुक्त विद्यापीठाचे परीक्षेचे पेपर पायाने सुंदर व स्वच्छ अक्षरात लिहिले असून जवळपास १३ पानी पेपर सोडवला आहे.

अभ्यास केंद्राचे केंद्रप्रमुख व केंद्र संयोजक यांनी विद्यापीठ नियमानुसार सुरजला लेखनिक, वेळ वाढवून देणे किंवा वेगळा परीक्षा वर्ग देणे या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असतानाही , त्याने नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबर स्वतः पेपर लिहिण्याची तयारी दाखवली.  मुक्त विद्यापीठामुळे माझे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न साकार होत आहे याचा मनस्वी आनंद असल्याचे बोलून दाखवले . सुरज च्या जिद्दीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्र कुलगुरू वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार पुणे कुलसचिव व परीक्षा नियंत्रक यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

YUVRAJ PHARANDE
Author: YUVRAJ PHARANDE

Leave a Comment

पुढे वाचा