चिकनगुनिया चा व्हायरस जास्त धोकादायक बनत चालला आहे का ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा ) चिकनगुनिया चा व्हायरस जास्त धोकादायक बनत चालला आहे का ?

मित्रांनो पावसाळा म्हंटले की सध्या दरवर्षी आपल्याकडे डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्ही आजाराचे पेशंट यायला सुरुवात होते. गमतीत म्हणायचे झाले तर मग खऱ्या अर्थाने डॉक्टरांचा सीजन सुरु होतो ! यावर्षी पण नेमीची येतो पावसाळा या उक्तीला सार्थ करत डेंगू आणि चिकनगुनिया या दोन्ही आजाराचे पेशंट सुरू झाले. पण कोविड नंतर कोणताही व्हायरस भरोसा ठेवण्यासारखा राहिला नाही असेच म्हणावे लागेल. असे का ते पण आता सांगतो. आणि सध्या जी माहिती हाती येत आहे ती पण सर्वांना सावधान करणारीच आहे …

सुमारे तीन आठवड्यापूर्वी वडिलांचे एक मित्र चिकनगुनिया सदृश्य आजाराने आजारी पडले. सुरुवातीचे उपचार त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडून घेतले. पण हळूहळू त्यांच्या हाता पाया मधली ताकद कमी होत गेली. इतकी की त्यांना स्वतःहून उठायला , बसायला , चालायला सुद्धा अशक्य व्हायला लागले ( severe weakness in limb muscles ) . त्यामुळे शेवटी त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले.

तिथे उपचार सुरू झाले. उपचार करणाऱ्या फिजिशियन ना पहिला संशय पक्षाघात अर्थात स्ट्रोक किंवा पॅरलेसिस चा आला. MRI व अन्य चाचण्या केल्यानंतर असे लक्षात आले की तसे नाही आहे. पेशंट चा मला फोन आल्यानंतर त्यांच्याशी मी सविस्तर बोललो .. कशा पद्धतीने आजार वाढत गेला , बाकी लक्षणांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर फिजिशियन बरोबर माझी चर्चा झाली आणि मी एक शक्यता वर्तवली ती म्हणजे – पेशंटला गीलीयन बॅरी सिंड्रोम ( GB SYNDROME ) असू शकेल का ? ..

त्या अनुषंगाने मग त्यांच्या चाचण्या Nerve conduction test इत्यादी केल्या गेल्या आणि त्यांचे निदान पक्के झाले ते म्हणजे विषाणू आजार पश्चात त्यांना GB SYNDROME झालेला होता आणि त्यामुळे त्यांच्या हाता – पायामधील ताकद कमी झालेली होती. या केस मध्ये थोडे GB SYNDROME चे atypical presentation होते. त्यांची शरीराची डावी बाजू बाधित झाली होती ( Left sided hemiparesis ).

त्यानंतर त्वरेने त्यांना Immunotherapy अर्थात IV IMMUNOGLOBULIN दिले गेले आणि त्यानंतर त्यांची प्रगती वेगाने झाली. आता ते पूर्णपणे व्यवस्थित चालत आहेत. त्वरित निदान झाल्यामुळे आजार वाढत गेला नाही ( disease progression stopped ) … श्वसनाच्या स्नायूंवर परिणाम झाला नाही ( serious Complication of respiratory paralysis avoided) . GB SYNDROME मुळे जर का श्वसनाच्या स्नायूंवरती हल्ला झाला तर पेशंटला व्हेंटिलेटर वर ठेवण्याची गरज भासते.

सध्या सुद्धा माझ्याकडे एक चिकनगुनिया सदृश्य आजाराचा एक पेशंट आहे की ज्यामध्ये GB SYNDROME सदृश्य लक्षणे दिसत आहेत आणि त्याला Hospitalisation सल्ला दिला गेला आहे.

जेव्हा पहिल्या केस चे निदान झाले तेव्हा कोणतेही रेफरन्स नव्हते पण सध्या जी माहिती हातात येत आहे त्यानुसार चिकनगुनिया च्या काही पेशंटमध्ये मुख्यत्वे करून ज्यांचे वय जास्त आहे ( Elderly patients ) त्यांच्यामध्ये वाढत्या प्रमाणामध्ये Neurological complications होत असताना दिसत आहेत. चिकनगुनिया व्हायरस चे इन्फेक्शन झालेल्या वयस्कर रुग्णांमध्ये GB SYNDROME चे प्रमाण सध्या वाढत असताना दिसत आहे. ( Gullian – Barre Syndrome संदर्भात यापूर्वी मी विस्ताराने लिहिलेली पोस्ट आपण वाचलेली नसल्यास नक्की वाचा )

डॉ. अमित द्रविड जे Infectious disease स्पेशालिस्ट आहेत त्यांनी सध्या धुमाकूळ घालत असलेल्या चिकनगुनिया आजाराच्या व्हायरस मध्ये काही बदल झाले आहेत का अशी शंका व्यक्त केली आहे आणि त्या अनुषंगाने NIV मध्ये तपासण्यांसाठी सॅम्पल दिली गेलेली आहेत.

सध्या जी चिकनगुनियाची साथ आहे त्यासाठी कारणीभूत व्हायरस Asian strain आहे का African strain आहे तसेच त्यामध्ये काही मूलभूत बदल ( mutation ) झालेले आहेत का हे बघणे सुद्धा गरजेचे आहे.

चिकनगुनिया आजारामुळे मुख्यत्वे करून वयस्कर रुग्णांमध्ये मेंदू आणि चेतासंस्थेमध्ये गुंतागुंती ची लक्षणे वाढत असताना दिसत आहेत ( Encephalitis , Cerebellitis etc ) . काही रुग्णांमध्ये हृदयाच्या स्नायूंवरती सुद्धा या व्हायरसचा परिणाम होत असलेला दिसत आहे ( Myocarditis ) . तसेच काही रुग्णांमध्ये श्वसनाची लक्षणे उत्पन्न होऊन Pneumonia झालेला दिसत आहे.

यानिमित्ताने सर्व फॅमिली फिजिशियन आणि जनरल प्रॅक्टिशनर यांना सांगणे आहे की चिकनगुनिया या आजाराचा पेशंट मुख्यत्वे करून वयस्कर असलेला, आपल्याकडे आल्यास थोडे सावध रहा ! … तपासणीसाठी व्यवस्थित वेळ द्या. व्यवस्थित हिस्ट्री घ्या. कोणतेही alarming signs त्याच्यामध्ये नाहीत ना याची खातर जमा करा. FOLLOW UP व्यवस्थित घ्या आणि पेशंट बरा झाल्याची खात्री करा. या रुग्णांमध्ये वर सांगितलेले कोणतेही Red Flag signs दिसल्यास त्याला त्वरेने तज्ञ डॉक्टरांकडे पुढील उपचारासाठी पाठवा.

थोडक्यात चिकनगुनिया म्हणजे सांधेदुखी स्नायूदुखी आणि बरेच काही ! .. असे आहे. त्यातील बरेच काही वरती पण लक्ष द्या आणि पेन किलर आणि स्टिरॉइड याच्या पलीकडे जाऊन चिकनगुनिया चा पेशंट तपासा आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून वेळेवरती निदान करा व निष्णात डॉक्टर बना !

डॉ. पद्मनाभ केसकर
आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे
Mobile – 9762258650

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा