बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा) – बारामतीतील पाटस रोड येथे बूथ कमिटी व कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी पदाधिकारी आणि पक्षाचा कणा असलेल्या कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. तत्पूर्वी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना नोंदणी उपक्रम उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडला.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांपासून ते नवजात बालकांपर्यंत सगळ्यांनाच लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य सरकारनं प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व समाज घटकाला शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावेत, हेच आमचं उद्दिष्ट आहे. या योजनेमार्फत १ हजार ३५० वेगवेगळ्या आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी लिंकचा वापर करा https://www.facebook.com/share/xWk4ByqDmFGgDPbJ











